विजेच्या धक्याने वृद्धाचा मृत्यू

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाल येथे एका तलावाजवळ मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका ३६ वर्षीय व्यक्तीचा विद्युत शॉक लागुन मृत्यू झाल्याची घटना (दि. ३१) शनिवार रोजी दुपारी १२ वाजता घडली. याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश मोतीराम मखरिये वय ३६ वर्षे (रा. वडोद बाजार ता. फुलंब्री) असे शॉक लागुन मृत पावलेल्या व्यक्तींचे नांव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाल ता. फुलंब्री येथील एका तलावाजवळ मासे पकडण्यासाठी सुरेश मखरिये यांच्यासह त्यांचे भाऊ व चुलत भाऊ हे गेले असता त्या तलावा लगतच विद्युत वायर गेलेली होती. 

त्या विद्युत तारेला मखरिये यांचे डोके लागले त्यात विद्युत प्रवाह सुरु असल्याने त्याचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.